बिबट्याच्या हल्ल्यात जर्शी गाईचा मृत्यू, लांजा धुंदरे येथील घटना

 

लांजा (प्रतिनिधी) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जर्शी गाईचा मृत्यू झाल्याची घटना लांजा धुंदरे येथे घडली आहे. या घटनेत मालकाचे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
लांजा शहरा नजीकच्या धुंदरे येथील ममता अनिल दुडये यांनी नेहमीप्रमाणे आपल्या काजुच्या बागेत गुरे चरण्यास सोडली असताना सकाळी ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्याने बिबट्याने अचानकपणे
जर्शी गाई वर हल्ला केला . बिबट्याच्या या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला.

 

सदर घटनेची माहिती लांजा वनरक्षक यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. या घटनेत मालक ममता अनिल दुडये यांचे सुमारे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी या अगोदर अन्य प्राण्यांनवर हल्ला करून जखमी केले आहे.
धुंदरे परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. सध्या शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत बिबट्याच्या संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी गावातील ग्रामस्थांतून केली जात आहे.