भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंपर्क अभियान अंतर्गत वेंगुर्ले उभादांडा पं.स मतदारसंघ व वेंगुर्ले शहराचा उद्या १२ एप्रिल रोजी साई मंगल कार्यालयात मेळावा..

Google search engine
Google search engine

Under BJP’s Mahavijay 2024 public relations campaign, Vengurle Ubhadanda P.S Constituency and Vengurle city will meet tomorrow on 12th April at Sai Mangal office.

मोदी सरकारच्या विविध योजनांच्या मोफत कार्ड वाटपाचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते होणार शुभारंभ..

वेंगुर्ले | प्रतिनिधी : भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंपर्क अभियान , सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेली १५ दिवस सुरु आहे . सावंतवाडी तालुक्यातुन सुरु झालेले अभियान , दोडामार्ग तालुका तसेच वेंगुर्ले तालुक्यातील चार जि.प.मतदार संघात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे . या अभियानात गावागावातील विवीध विकास कामांचा शुभारंभ व भूमीपूजन करण्यात येत आहेत .
अभियानाच्या वेंगुर्ले तालुक्याच्या दुसर्‍या टप्प्यात उभादांडा पंचायत समिती मतदारसंघ व वेंगुर्ले शहर तसेच म्हापण जि. प. मतदारसंघात बैठकाचे आयोजन केले आहे .

बुधवार दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी १० = ३० वाजता आयोजित केलेल्या महाविजय २०२४ या अभियानात लाभार्थी मेळावा होणार असून , मोदी सरकारच्या ई – श्रम योजना , आयुष्यमान भारत योजना, सुकन्या समृद्धी योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत कार्ड वाटपाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
भाजपाच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरातील ५५० लाभार्थ्यांना मोफत ई – श्रम कार्ड चे वाटप , १५० आयुष्यमान भारत कार्ड वाटप तसेच ५० सुकन्या समृद्धी योजनेच्या पास बुकचे वाटप करण्यात येणार आहे .
तरी उभादांडा , परबवाडा व वेंगुर्ले शहरातील भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे .