रत्नागिरी | प्रतिनिधी : रेल्वे प्रवासादरम्यान तरुणाचा 22 हजार रुपयांचा मोबाईल लांबवणार्या अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना शुक्रवार 21 जून रोजी पहाटे 4.46 वा.रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर घडली.
याबाबत मुकेश हिरालाल पवार (32,रा.सिमरिया बैतुल,मध्यप्रदेश) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, गुरुवार 20 जून रोजी सकाळी 11.30 वा. मुकेश पवार हा मंडगाव स्पेशल ट्रेनने थिबिम ते नागपूर असा प्रवास करत होता. प्रवासादम्यान तो झोपलेला असता त्याची रेल्वे रत्नागिरी स्टेशनवर आली असता त्याला जाग आली. तेव्हा त्याला चार्जिंगला लावलेला आपला मोबाईल मिळून आला नाही.












