त्या चौघांना १० जून पर्यत पोलीस कोठडी

 

खेड(प्रतिनिधी) महामार्ग वरील भरणे जाधव वाडी नजीक व साखरपा येथे बिबट्या वाघाची नखे विक्री साठी घेऊन आलेल्या तिघांना भरणे व एकास साखरपा येथे मुद्दे माला सह अटक करण्यात आलेल्या त्या चार जणांना न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग -०१, दापोली यांचेसमोर हजर केले असता, त्यांना १० जून पर्यंत रिमांड कस्टडी मंजूर करणेत आली आहे.

दिलीप सावळेराम कडलग व.व. ४८ रा. घाटकोपर, मुंबई , अतुल विनोद दांडेकर व व. ३६ रा. चेंबुर, मुंबई विनोद पांडुरंग कदम व.व. ४२ रा. सावर्डे ता. चिपळूण सचिन रमेश गुरव रा. गोविळ ता. लांजा जि. रत्नागिरी
अशी त्या अटक करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत

घडलेला गुन्हा हा पैशाच्या आमिषापोटी घडलेला असून यातून मिळणारा पैसा हा आपापसात विभागून घेण्यात येणार होता. यातील मुख्य संशयित पर्यंत पोहोचणे महत्वाचे होते. यासाठी यातील अतुल विनोद दांडेकर याचेकडे कसून चौकशी केली असता, गुन्हयातील ४ बिबट नखे ही सचिन रमेश गुरव रा. गोविळ ता. लांजा या इसमाकडून रूपये १८ हजार देवून आणले असलेचे कबुल केले. तसेच आणखी काही नखे सचिन गुरव यांचेकडे असलेचे सांगितल्याने ६ जून रोजी साखरपा ता. संगमेश्वर येथे सापळा रचून सचिन रमेश गुरव रा. गोविळ ता. लांजा यास जेरबंद करण्यात यश आले