खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गा वरील खेड रेल्वे स्थानक रस्त्यावर दुचाकी वरून कोसळलेल्या ५४ वर्षीय महिलेचे ४ जून रोजी उपचार सुरू असताना सर जे.जे. रुग्णालय मुंबई येथे निधन झाले या प्रकरणी २५ जून रोजी येथील पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे
अनिता रमेश निकम, वय – ५४, रा.सुकीवली, ता.खेड
असे त्या निधन झालेल्या महिलेचे नाव आहे
यातील मयत अनिता रमेश निकम हि प्रदिप चव्हाण यांचे मोटर सायकल वरुन कामाचे ठिकाणी जाण्यासाठी राहते घरातून निघाले व खेड रेल्वे स्टेशन जवळील बस स्टॉप जवळ असताना एक ट्रक समोरुन येत होता त्याच वेळी नमूद ट्रकचे पाठीमागून एक काळ्या रंगाची मोटार सायकल ट्रकला ओव्हरटेक करुन पुढे आली असता त्याने त्याचे ताब्यातील मोटर सायकल ही रस्त्याचे पुढे आली असता त्यांचे पाठीमागील सीट वर बसलेल्या मयत हि घाबरुन मोटरसायकल वरुव उडी मारली म्हणून तिच्या उजव्या कानातून व नाकातून रक्त येऊ लागल्याने तिला उपचाराकिता रॉयल हॉस्पीटल खेड येथे नेले असता तिला अधिक उपचारकरिता जे. जे. रुग्णालय मुंबई येथे घेऊन जाण्यास सांगीतले व तिला मुंबई येथे अॅडमीट केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे घोषीत केले .











