सोमेश्वरनगर: निंबुत (ता. बारामती) येथे झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले रणजित एकनाथ निंबाळकर यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. यामुळे आता गौरव काकडे व गौतम काकडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे.
या घटनेने बैलगाडा शर्यत क्षेत्रात दुःखद वातावरण पसरले आहे.
शर्यतीच्या बैलाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून बिनसल्याने निंबुत (ता. बारामती) येथे गुरुवारी रात्री अकरानंतर घडलेल्या घटनेत रणजित एकनाथ निंबाळकर (रा. फलटण जि. सातारा) हे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांना सुरुवातीला बारामतीला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती बिघडल्याने पुण्याला मोठ्या खासगी रुग्णालयात नेले. शुक्रवारी दुपारी शस्त्रक्रियादेखील झाली. मात्र शनिवारी पहाटे त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
निंबाळकर हे फलटणमध्ये ज्ञानज्योती पोलीस भरती अकादमी चालवत होते. मागील वर्षी भरतीचे हँडविल वाटण्यासाठी पेडगावला गेले आणि तिथे भरलेला बैलांच्या शर्यतीचा फड पाहिला. तेंव्हापासून त्यांनी या क्षेत्रात झोकून दिले. बैलगाडा संघटनेचे नेते मानले गेलेले गौतम काकडे यांचा सर्जा हा बैल 61 लाखाला खरेदी करून ते राज्यभर चर्चेत आले होते. त्यांच्याकडे सर्जासोबत सुंदर हाही प्रसिद्ध बैल होता. त्यामुळे लवकरच त्यांची बैलगाडा क्षेत्रातील ‘सर’ नावाने ख्याती झाली.
निंबाळकर हे फलटणमध्ये ज्ञानज्योती पोलीस भरती अकादमी चालवत होते. मागील वर्षी भरतीचे हँडविल वाटण्यासाठी पेडगावला गेले आणि तिथे भरलेला बैलांच्या शर्यतीचा फड पाहिला. तेंव्हापासून त्यांनी या क्षेत्रात झोकून दिले. बैलगाडा संघटनेचे नेते मानले गेलेले गौतम काकडे यांचा सर्जा हा बैल 61 लाखाला खरेदी करून ते राज्यभर चर्चेत आले होते. त्यांच्याकडे सर्जासोबत सुंदर हाही प्रसिद्ध बैल होता. त्यामुळे लवकरच त्यांची बैलगाडा क्षेत्रातील ‘सर’ नावाने ख्याती झाली.दरम्यान, गौतम काकडे व गौरव काकडे हे सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष शहाजी काकडे यांचे मुलगे आहेत. शहाजी काकडे यांचा घटनेत अथवा फिर्यादीच्या तक्रारीत सहभाग नाही. मात्र पिस्तूल परवाना शहाजी काकडे यांचा असल्याने त्यांना व गौरव काकडे याना पोलिसांनी अटक केली होती. दोघांनाही बारामती न्यायालयाकडून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे तर गौतम काकडे फरार आहेत.











