“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना लाभाची ठरेल : जिल्हा महिला अध्यक्ष सौ. सुजाता साळवी

प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देणारी महायुती सरकारची ही योजना महिलांचे सक्षमीकरण करणारी

खा. नारायण राणे, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार

रत्नागिरी : काल महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला आणि आम्हा महिलांना खूपच आनंद झाला हा अर्थसंकल्प खास महिलांच्या विषेश कल्याणकारी योजनांचा त्यांच्या सशक्तीकर करणारा यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून महिना १५०० रु मिळणार आहेत तसेच मुली साठी वैद्यकिय तसेच अभियांत्रिकी शिक्षण मोफत मिळणार, मुख्यमंत्री अन्नपूर्णा महीला बचत गट यांच्या निधी मध्ये वाढ झाली आहे, २५ लाख महिलांना लखपती बनवणारे महाराष्ट्र सरकार म्हणूनच कालचा अर्थसंकल्प हा शैक्षणिक सामाजिक आणि सशक्तीकरण यावर भर देणारा आहे.

प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना ही, लाभार्थी महिलांना आधारवड ठरणारी योजना आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. अशा प्रत्येक महिलेला या योजनेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे.

महायुती सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. येणारी विधानसभा निवडणूक पाहता यावर्षीच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण यासोबतच शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर करण्यात आला होता. आणि काल अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री श्री अजित पवार, यांचे आभार मानत असल्याची माहिती सुजाता साळवी यांनी दिली. पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून योजना प्रभावीपणे राबवली जाईल असेही साळवी यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला 1500/- रुपये देण्यात येणार. आणि या योजनेसाठी सरकारकडून 46000 कोटी रुपयांचा भरीव तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 95 लाख महिलांना या योजनेचा फायदा होईल असा अंदाज आहे.

महायुती सरकार वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देणारी अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाला ही योजना पोषक ठरेल आणि 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबाला या योजनेचा लाभ होईल असं सुद्धा अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे. राज्यातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रामध्ये सहा लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून त्यांची संख्या सात लाखांपर्यंत वाढवण्यात येणार. महिला उ‌द्योजकांसाठी 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुद्धा सुरू करणार असल्याचं सरकारने सांगितले आहे. महिला व बालकां विरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी 100 विशेष जलद गती न्यायालयांना आवश्यक निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यादेखील योजना सुरु केल्या या सर्व योजना महिलांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे असे सौ. सुजाता साळवी म्हणाल्या.