लाल बहादूर शास्त्री हायस्कूल मध्ये वृक्ष दिंडी सोहळा संपन्न

मंडणगड/प्रतिनिधी . मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथे महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्त प्रशालेत वृक्ष दिंडी सोहळा संपन्न झाला. प्रथम वृक्ष दिंडी चे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आबासाहेब हुलगे सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी पालखी खांद्यावर घेवून ढोल ताशांच्या गजरात लेझिम नृत्य करत मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली. प्रशालेतील हरित सेना विभाग प्रमुख सौ विनया नाटेकर मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. ढोल ,लेझिम पथक याची तयारी प्रशालेचे क्रीडा शिक्षक गौतम माने सर यांनी केली होती.

 

 

 

मिरवणुकी मध्ये झाडे लावण्यासाठी, झाडांचे संवर्धन करण्यासाठी वेगवेगळी घोषवाक्यांची घोषणा देत ग्रामस्थांमध्ये जन जांगृती केली. प्रशालेत तसेच गावांमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या सोहळ्यास गट विकास अधिकारी विशाल जाधव सर,सामाजिक वनीकरण विभाग किरण पाटील,कृषी अधिकारी पाटील साहेब, ग्रा. प .दहागाव सरपंच मंगेश दळवी, उपसरपंच रुपाली मोरे, माझी तंटा मुक्ती अध्यक्ष सुरेश खाडे , ग्रा. प. दहागाव सदस्य, विक्रम शेले सर, मानसी पालांडे मॅडम,सौ विनया नाटेकर ,गौतम माने,जितेंद्र कलमकर, प्रमोद जाधव,अनिता पवार, शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा दळवी,महेंद्र गुडेकर ,संजय गौड, विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ उपस्थित होते