दापोली l प्रतिनिधी :- दापोली बाजारपेठेतील एका लॉजमध्ये अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध विभागाच्या पथकाने टाकलेल्या संशयित आरोपीला आज न्यायालयात हजर केले गेले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत कोठडी सुनावण्यात आली आहे.
या छाप्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक विभागाच्या उपनिरीक्षक गायत्री पाटील, हेड कॉन्स्टेबल सांची सावंत, सुभाष भागणे, नितीन डोमणे, शांताराम झोरे तर दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे उपनिरीक्षक यादव, गंगधर, चव्हाण सहभागी झाले होते. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करीत आहेत. या प्रकाराची दापोली पोलीस ठाणे दखलपात्र गुन्हा रजि नं-119/2024, भा.न्या.सं कलम 143, स्ञिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3,4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आता या प्रकरणानंतर आणखी दापोली तालुक्यात काही ठिकाणी अशा स्वरूपाचे उद्योग चालतात का? याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चिपळूण येथेही असाच गंभीर प्रकार समोर आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.









