
दापोली | प्रतिनिधी: नुकताच रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी किर्ती किरण पुजार यांचे उपस्थितीत गणेश कोंडीराम मंडलिक, गट विकास अधिकारी व एस.बी. खरात, सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत विविध विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी, रक्तदान व अॅक्सीडंटल इन्शुरन्स शिबीराचे आयोजन पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करणेत आले होते.
कार्यालयीन कामकाज करित असताना कर्मचारी यांना वेळेअभावी व कामकाच्या अतिरीक्त ताणतणावामुळे आपल्या स्वत्ःच्या शरीराकडे दूर्लक्ष होवून बऱ्याच वेळेस मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेवून दापोली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी दिनांक नुकतेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून सदर शिबिरामार्फत पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत व सर्व विभागातील अधिकारी/कर्मचारी, अंगणवाडी सेविका/मदतनिस/आशा कर्मचारी व सर्व कंत्राटी कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांना मोफत आरोग्य तपासणी करण्याची सक्ती केली. सर्व कर्मचारी यांनी सदर शिबिरासाठी प्रतिसाद उत्स्फूर्तपणे दिल्याचे शिबिराअंती दिसून आले.
आरोग्य तपासणीचा दुसरा भाग म्हणजे रक्तदान शिबीर. यामध्ये पंचायत समितीच्या बऱ्याच कर्मचा-यांनी ग्रामसेवक व विविध विभागातील कर्मचारी यांनी रक्तदान शिबीरामध्ये भाग घेतला. यामध्ये ५० रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले.
पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी वैयक्तिक विमा व पोस्ट विमा शिबीराचे आयोजन पंचायत समिती स्तरावर करण्यात आले. ज्या कर्मचा-यांनी विमा काढलेला नाही त्यांना मार्गदशन करून रोजच्या कामकाजाच्या वातावरणात अचानक येणा-या अॅक्सीडेंटल घटनांसाठी विमा किती महत्वाचा असतो, त्यापासून होणा-या फायद्यांची माहिती करून देणेचे दृष्टीने गट विकास अधिकारी श्री. मंडलिक यांनी विमा शिबिरांचे आयोजन करून यशस्वी रित्या पार पाडले.
या शिबीरासाठी उपस्थित असणा-या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे हस्ते पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेतक-यांना पारंपारीक पद्धतीने भाताची लागवड करताना चार सुत्री भात लागवड केल्याने होणा-या फायद्यांची माहिती होणेसाठी ग्रामपंचायत आपटी येथे चार सुत्री भात लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आपटी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी कृषी यांनी सहभाग घेवून भात लावणी करणेसाठी सहभाग घेतला.












