माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचे आदर्शवत सेवाकार्य

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शिरवंडे गावातील पात्र महिलांच्या नोंदणीसाठी भाजपच्या माध्यमातून पुढाकार

अमित खोत | मालवण : महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये शासनाच्या वतीने दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ भाजपाच्या माध्यमातून शिरवंडे गावातील जास्तीत जास्त पात्र महिलांना होण्यासाठी माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी पुढाकार घेतला आहे. या योजनेच्या माहितीसाठी वाडीवाडीत बैठका घेत त्यांनी योजनेची माहिती पोहोचवली असून आतापर्यंत सुमारे 170 महिलांची ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात नोंदणी ग्रामपंचायतीत पूर्ण झाली आहे. गावातील जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी साठी प्रसंगी जास्त मनुष्यबळ, नोंदणी प्रणालीचा वापर करून आर्थिक भार ही स्वतः उचलण्याचा निर्णय सुनील घाडीगांवकर यांनी घेतला आहे.

 

 

महिलांना सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, महिलांना सशक्तीकरणासाठी चालना देणे अश्या महिलांवर अवलंबित मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” आणली आहे. या योजनेसाठी महिलांनी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ होणार आहे.

 

 

या योजनेचा शिरवंडे गावातील जास्तीत जास्त महिलांना लाभ होण्यासाठी माजी पं. स. सभापती सुनील घाडीगांवकर यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपाच्या माध्यमातून गावात वाडीनिहाय संघटनात्मक बैठका घेत त्यांनी महिलांना या योजनेचे महत्व आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती सादर केली. यावेळी सुनील घाडीगांवकर यांच्यासह भाजपचे बूथ अध्यक्ष संजय गावकर, सरपंच चैताली गावकर, उपसरपंच सुरेश गावकर, कैलास गावकर, विजय खांडेकर, सोनू गावकर, प्रकाश गावकर, सुभाष गावकर, विश्वनाथ गावकर, प्रभाकर गावकर, दिलीप भाट, रमेश बाणे, हनुमंत गावकर, माजी सरपंच संतोष लाड यांच्यासह भाजपाचे गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

या सर्व महिलांना ग्रामपंचायतीत एकत्र करून त्यांचे ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात आले. उर्वरित महिलांना देखील याचा लाभ देऊन या सर्वांचे ऑनलाईन अर्ज सबमिट केले जाणार आहेत. या कामासाठी शिरवंडे ग्रामसेवक सचिन आनंद पवार, लिपिक चंद्रकांत विनायक गांवकर, शिपाई शेखर शरद गांवकर, डाटा ओपरेटर दिगंबर कालिदास गांवकर, अंगणवाडी सेविका सौ. गीता शंकर खानोलकर, सौ विद्या बाबू चव्हाण आदींचे सहकार्य लाभल्याचे सुनील घाडीगांवकर यांनी दिली.