गोठ्यावर झाड कोसळून 37 हजार रुपयांचे नुकसान तालुक्यातील निव सर येथील घटना 

 

लांजा( प्रतिनिधी) तुफानी पावसामुळे गुरांच्या गोठ्यावर झाड कोसळून सुमारे 37 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज रविवारी 7 जुलै रोजी तालुक्यातील निवसर येथे घडली आहे

शनिवारपासून पावसात तालुक्याने कहर केला असून धुवाधार पणे पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यात सर्वत्र दाणादाण उडाली आहे. लांजा शहरासह तालुक्यात विजेचा खेळ खंडोबा सुरू असून बहुतांश ठिकाणी वीज पूर्णतः गायब झाल्याने लोकांचे हाल होत आहेत.आज रविवारी सकाळी निवसर येथील श्रीमती लक्ष्मी भिकाजी शिंदे यांच्या गुरांच्या गोठ्यावर वादळी वारा व पावसामुळे झाड कोसळले.या घटनेत त्यांच्या गोठ्याचे सुमारे 37 हजार 870 रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेचा पंचनामा तलाठ्यांकडून करण्यात आला आहे.