लांजा (प्रतिनिधी) :शहरातील वैभव वसाहत येथून ४५ वर्षीय महिला दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली आहे. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
गुफरान अशरफ पाटणकर( वय २२ वर्षे राहणार वैभव वसाहत अब्दुल गणी मुन्शी यांची चाळ) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बेपत्ता महिला सौ. हवाबी अशरफ पाटणकर (वय ४५) ही त्याची आई असून गेल्या दीड महिन्यापासून ती पित्ताचे पिशवीच्या आजाराने ती आजारी होती. तसेच तिचे आजारावर कोल्हापूर अस्टर आधार येथे औषधोपचार सुरू होते. तसेच घरात काही कारण नसताना सदर महिला कोणाला काहीही न सांगता दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्याने पती अशरफ मुसा पाटणकर यांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला.तसेच नातेवाईकांकडे देखील चौकशी केली. मात्र तिचा कोठेही शोध लागलेला नाही.
त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.













