पाळणेकोंड धरणाचे सहाही हायड्रॉलिक दरवाजे उघडले

 

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून जलपूजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाळणेकोंड धरणाचे सहाही हायड्रॉलिक दरवाजे उघडले आहेत. हे धरण तुडुंब भरले असून सावंतवाडी शहरातील नागरीकांसाठी ही समाधानाची बाब ठरली आहे.

 

दरम्यान, धरण भरल्याचे औचित्य साधून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी पाळणेकोंड धरणावर जात जलपूजन केले. तसेच त्यांनी धरण परिसरातील गणेश प्रतिमेचे ही पूजन केले. यावेळी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता भाऊ भिसे तसेच पिळणकर आदी उपस्थित होते.