मतापित्याने केले मुलाचे मरणोत्तर देहदान

 

संस्थानच्या माध्यमातून ५८ वे देहदान

मुंबई :  मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडावे या भूमिकेतून सर्वंभ मणिज पडावे (वय १६) याचे मरणोत्तर देहदान करण्यात आहे. सर्वभचे काल अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्याच्या मतापित्याने घेतलेला हा निर्णय सर्वांनाच भारावून टाकणारा आहे.

 

मुंबई जिल्हा अंतर्गत विलेपार्ले तालुक्यातील गुरुबंधू व मुंबई उपपीठ व्यवस्थापक श्री. मनोज मनोहर पाडावे यांचा सर्वंभ मोठा मुलगा. तो कुटुंबासह भागीरथी स्मृती सोसायटी, विलेपार्ले पूर्व, जिल्हा मुंबई येथे रहात होता. त्याचे 9 जुलै रोजी सकाळी अल्पशा आजाराने अकस्मित निधन झाले. सर्वंभच्या जाण्याने पाडावे कुटुंबावर खूपच मोठा आघात झाला झाला होता, परंतु श्री मनोज मनोहर पाडावे व त्यांची पत्नी सौ मानसी मनोज पाडावे यांनी आपला मुलगा आपल्या सोबत नाही, परंतु त्याचा देह समाजाच्या उपयोगी पडावा या उद्देशाने व मरावे परी कीर्तीरुपी उरावे या उक्तीप्रमाणे मुलाचा देह समाजाच्या कार्यास अर्पण केला. मुंबईच्या नायर हॉस्पिटल येथे त्याचे मरणोत्तर देहदान केले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची शिकवण अंमलात आणली. त्यांनी भाविकांना मरणोत्तर देहदान करण्याचे आवाहन केले होते. त्याला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला होता.

 

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे झालेले हे ५८ वे मरणोत्तर देहदान आहे.
या निर्णयाबद्दल गुरुबंधू श्री.मनोज मनोहर पाडावे आणि पाडावे परिवार यांचे संपूर्ण संप्रदायाच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले. त्यांच्या मुलाच्या पुण्यात्म्यास उत्तम गती व शांती लाभो ही जगद्गुरुश्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
नायर हॉस्पिटल येथे देहदान करताना वडील श्री. मनोज पाडावे, आई : सौ. मानसी पाडावे, भाऊ : कु. ऋग्वेद मनोज पाडावे, काका : श्री. महेंद्र पाडावे, आत्या : श्री. ममता राणे, काका : श्री. रविदास राणे, आजेकाका : श्री.भिकाजी पाडावे व श्री.यशवंत पाडावे, आजेमामा : श्री.शंकर नाईक, काका : श्री. सुनील परब, सुधीर परब, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते.
तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे मुंबईतील पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.