खेड शहर भाजपा व संघ परिवाराकडून खेड रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम

खेड(प्रतिनिधी) खेड शहर भाजपा व संघ परिवाराकडून खेड रेल्वे स्थानकावर सोमवारी स्वच्छता मोहीम राबवून धूर फवारणी करण्यात आली या सामजिक कार्या बद्दल सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
रविवारी मुसळधार झालेल्या पावसामुळे दिवाण खवटी  नजीक दरड कोसळून ठप्प झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे येथील रेल्वे स्थानकावर थांबलेले प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर सामजिक बांधिलकी जोपासत संघ परिवार  व भाजप खेड शहर  यांच्या कडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत भाजपा शहराध्यक्ष अनिकेत कानडे, उल्हास बाळ, ओंकार पाटणे, अजय तोडकरी, रोहन राठोड, वैजेश  सागवेकर व स्वयंसेवक ( संघ परिवार  ) आदी पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते