मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बट्याबोळ केला,ठेकेदारांवर १५ दिवसात कारवाई करा

पालकमंत्री चव्हाण यांचे आदेश

जिल्हा नियोजन समिती बैठक

संतोष राऊळ (ओरोस) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर १५ दिवसात कारवाई करा. नुसते आदेश नको तर कारवाईची हेडलाईन्स झाली पाहिजे.ठेकदारांच्या नावासहित कारवाईची प्रसिद्धी करा. शासन निधी देतो मात्र तुम्ही कामे करायची नाही आणि जे करतील त्यांना करायला द्याचे नाही. मी अजून पालकमंत्री आहे. या तीन महिन्यात नक्कीच बदल करणार.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पंतप्रधान योजनेचे प्रमाणे काम चालेले अशी अपेक्षा होती मात्र तुम्ही या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बट्याबोळ केला. पंधरादिवसात जे दोषी ठेकेदार असतील त्यांचेवर कारवाई करा नाहीतर मी तुम्हा अधिकाऱ्यांवर कारवाई करेन अशा शब्दात अधिकाऱ्यांना पालकमंत्री चव्हाण यांनी धारेवर धरले.

 

 

३०० कोटीची कामे मुख्यमंत्री सडक मधून मंजूर आहेत कामे पूर्णत्वास का जात नाहीत. ३६ कामे सुरू आहेत त्यात किती काम पूर्ण झाले. यावर आधिकरी कमी आहे. असे उत्तर उप आभियांत्यानी दिले.त्यावर अधिकारी खडी,डांबर टाकतो काय असा सवाल पालकमंत्री यांनी केले. कामाला दिरंगाई झाली तर काय करू शकतो असे विचारतात उप अभियंता सुतार यांनी मुदतवाढ देऊ शकतो असे सांगताच पालकमंत्री चव्हाण आणखीन चिडले आणि जबाबदार ठेकेदारावर कारवाई करा अशा सूचना दिल्या.

 

दरम्यान यावे बोलताना ज्यांना शक्य असेल त्यानेच कामे घ्यावीत एका ठेकेदारांकडे दहा दहा कामे आहेत असे सदस्य अबिद नाईक यांनी निर्दशनास आणून दिले. यावर निंबाळकर यांनी सर्वच खात्यात अशीच स्थिती आहे. तेच तेच ठेकेदार सर्वत्र आहेत आणि काम करत नाही.