जिल्हा परीषद शाळा क्रमांक 1, कापडगांव येथे दहावी, बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ संपन्न.

 

 

ग्रामपंचायत कापडगांव कार्य क्षेत्रातील जिल्हा परीषद शाळा क्रमांक 1, कापडगांव येथे शाळा व्यवस्थापन समिती व गावातील ग्रामस्थ यांच्यावतीने दिनांक 19-07-2024 रोजी कापडगांव येथील ईयत्ता दहावी, बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा गुण गौरव समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कोल्हापुर येथुन लाभलेले श्री. बडद सर यांसकडुन विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात कसा ठेवावा व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन लाभले. तसेच मा ना. उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून नागरिकांना छत्री वाटप करणेत आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रभाकर पेजे यांनी अध्यक्ष पद स्विकारले.

 

 

 

या कार्यक्रमासाठी कापडगांवचे सरपंच श्री. विघ्नेश कोत्रे, शिवराय प्रतिष्ठान युवा मंच कापडगांवचे अध्यक्ष प्रविण पेजे, माजी सरपंच रविंद्र मांडवकर यांचे कार्यक्रमाला बहुमुल्य सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे उपस्थित लेप्टनंट कॅप्टन दामोदर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाले, नितीन कांबळे पोलीस पाटील मुग्धा कांबळे उपसरपंच सपना पेजे, तंटामुक्त अध्यक्ष शांताराम कोत्रे, मुख्याध्यापक सौ. अवेरे मॅडम, सावंत सर, दिलिप कोत्रे सर सर्व शिक्षक, विजय कुरतडकर, बाळू कोत्रे, कृष्णा कुरतडकर, यशवंत पांचाळ, प्रकाश कोत्रे, शांताराम कोत्रे, समिधा पांचाळ, शिवानी कोत्रे, विद्यार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सरपंच विघ्नेश कोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगतां केली.