पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून वह्या उपलब्ध
अमित खोत | मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या वह्याचे वितरण शनिवारी मालवण शहरातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये करण्यात आले.
टोपीवाला हायस्कूल, टोपीवाला प्राथमिक शाळा, रोझरी इंग्लिश स्कूल, कन्याशाळा मालवण, जय गणेश स्कूल, धुरीवाडा जि.प. शाळा, जि.प. रेवतळे फाटक शाळा, देऊळवाडा जि.प. शाळा, प्रागतीक हायस्कूल, दांडी जि.प. शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी भाजपा पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडकर, तालूकासरचिटणीस महेश मांजरेकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. पूजा करलकर, शहराध्यक्ष सौ.अन्वेषा आचरेकर, महिला ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, तारका चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवामोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण नंदू देसाई यांसह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.












