खेड(प्रतिनिधी) बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या ७१ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला संघाने उपविजेते पद पटकावल्यानंतर या संघाचे खेडे येथे आगमन होतात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यानंतर झालेल्या अभिनंदन व स्वागत समारंभामध्ये खेड तालुक्यातील कबड्डीसाठी मोलाची मदत करणारे भरणे येथील श्री.काळकाई देवस्थान संस्थान, नवभारत हायस्कूल भरणे, खेड तालुका कबड्डी असोसिएशन, जे.सी.आय. खेड, लायन्स क्लब खेड, काळकाई कला, क्रीडा केंद्र भरणे यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
राज्य अजिंक्यपद अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केलेल्या खेडमधील कु.समरीन बुरोंडकर, कु.सिद्धी चाळके, कु.तस्मिन बुरोंडकर, कु.सुप्रिया थोरी, कु.प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह या विजयात आपल्या अनुभवाने रणनीती आखून व पूर्ण स्पर्धेचा वर्चस्व ठेवण्यासाठी अतुलनीय कामगिरी करणारे प्रशिक्षक श्री.दाजी राजगुरू, संघ व्यवस्थापिका सौ.संपदा गुजराथी यांचाही सन्मान करण्यात आला.










