दापोली | प्रतिनिधी: दापोली तालुक्यातील जालगांव येथील विस्तृत परिसर आणि मोठी लोकसंख्या असलेला गांव या गावात गेली अनेक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरूच असुन व्यावसायिक आणि सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत यावर अनेक वेळा बैठका, ठिय्या आंदोलन, प्रत्यक्ष भेटी होऊन देखील म्हणावा तसा बदल दिसत नव्हता याच कारणाने ग्रांमस्थाकडुन आ. योगेश कदम यांची भेट घेत त्यांच्या आदेशानुसार संबधीत खात्याच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
यामध्ये विज वाहिन्यांना सुरक्षा गार्ड बसवणे, कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्याना उद्धट उत्तरे,फोन न उचलणे, गावातील मागणी असलेल्या डीपी बसवणे, ग्रामसभांना खात्याचा प्रतिनीधी उपस्थित न रहाणे,गावातील विजेसंबधी सध्य स्थितीतील माहीती असलेल्या अनुभवी वायरमनची नेमणुक करणे,आणि महत्वाच्या वळणे एम.आय.डी.सी. येथिल मंजुर सबस्टेशनला निधी मंजुर करण्यासाठी प्रयत्न करावा अशा आशयाचे निवेदनात मांडलेल्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली त्यातील जे विषय तातडीने सुटण्यासारखे आहेत त्याची कार्यवाही संबधीत खात्याने पुढील आठ दिवसानी होणा-या आढावा सभेपुर्वी पुर्ण करून मला त्याचा अहवाल द्यावा अशा सक्त सुचना आ.योगेश कदम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या सबस्टेशन लवकर होण्याकामी स्वत: आमदार लक्ष घालणार असल्याचे याप्रसंगी सांगितले. दिवाळीपूर्वी सबस्टेशन निधी मंजुरीची भेट जालगांव ब्राम्हणवाडी तसेच परिसरातील जनतेला आपण देऊन या अनियमीत विजपुरवठ्याला पुर्णविराम द्यावा अशी इच्छा ग्रामस्थांकडुन व्यक्त करण्यात आली.
या बैठकीला मुख्य अभियंता खेड प्रमोद बारगडे, उपअभियंता कुकडे ,विभागाचे जेई श्री ओगले,जालगांव गावसई अद्यक्ष अशोक जालगांवकर,जालगांव गावसई उपाध्यक्ष रमेश कडु, मनोज भांबीड, विलास जालगांवकर,शिरीष देसाई,ग्रा.सदस्य मयुर मोहीते ,ब्राम्हणवाडी जेष्ठ सदस्य सुरेश रेवाळे, देवेंद्र शिन्दे ,गजानन कांबळे,श्रीरामनगर वाडी अद्यक्ष योगेश साटम,अमोल जाधव ,महावितरण खात्याचे अन्य विभागातील अधिकारी कर्मचारी या सभेला उपस्थित होते.











