करजुवे माखजन मार्गावरील प्रवास ठरतोय जीवघेणा

 

 

माखजन |वार्ताहर :  संगमेश्वर तालुक्यातील करजुवे माखजन या मुख्य रहदारीच्या मार्गावरील प्रवास बाजूच्या झाडांमुळे व अचानक घसरून येणाऱ्या मातीच्या ढीगाऱ्यामुळे ग्रामस्थ व वाहनधारकासाठी जीवघेणा ठरत आहे.या चिखलामुळे अनेक दुचाकीस्वार यात पडले असल्याचा घटना घडल्या आहेत.यामध्ये गंभीर इजा झाल्यास याला कोण जबाबदार असा सवाल ग्रामस्थंमधून विचारला जात आहे.

मे अखेरची तकलादू नाले सफाई तसेच रस्त्याची निकृष्ट डागडुजीमुळे रस्ता दयनीय बनला आहे.यावरून वाहन धारकांना कसरत करत आपली गाडी चालवावी लागत आहे. सद्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली आहे .अनेक ठिकाणी लांब पर्यँत खड्डे पडल्याने चारचाकी वाहन एका बाजूने कललेल्या अवस्थेत त्यातून मार्ग काढत पुढे जात आहे.तसेच रामणेवाडी जांगलदेव मंदिराजवळ रस्त्याचा भाग तुटला असून रस्ता खचत आहे . हा सततचा रहदारीचा मार्ग आहे .या मार्गावर बाजूच्या वृक्षांच्या, बाबूंच्या फांद्या वाकल्याने वाहनांना त्या त्रासदायक ठरत आहे.या मार्गावरून शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ये जा करत असतात.तर अनेक ठिकाणी वळण मार्गावर झाडी मुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने धोका निर्माण होत आहे.पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्तावरच पाणी साचून राहिल्या मुळे दल दल व गाळाचे साम्राराज्य निर्माण झाले आहे.अनेकदा रात्रीच्या वेळी प्रवास करताना खड्ड्यांचा अंदाज न आल्यास मोठा अनर्थ घडू शकतो.या मार्गाकडे बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने वाहन धारक प्रवाशी वर्गा सह ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.