आशिष मालवणकर मित्र मंडळ आयोजित  खासदार चषक 2024 क्रिकेट स्पर्धेत पावस संघ विजयी

 

राजापूर (वार्ताहर): आशिष मालवणकर मित्र मंडळ आयोजित खासदार चषक 2024, पर्व 3,पावसाळी क्रिकेट रबर बॉल लीग स्पर्धेत गावडे आंबेरे संघावर मात करीत पावस संघाने मानाचा खासदार चषक 2024 पटकावला.

ही स्पर्धा 9 ते 12 ऑगस्ट या कालावधीत येथील राजीव गांधी क्रिडांगणावर पार पडली. स्पर्धेत एकूण 30 संघांनी सहभाग घेतला होता.अंतिम सामना गावडे आंबेरे विरूध्द पावस असा झाला. यात पावस संघाने विजय मिळविला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, भाजपा नेत्या सौ. उल्का विश्वासराव, जिल्हा पदाधिकारी दीपक बेंद्रे, प्रा. मारुती कांबळे, सौ. शीतल पटेल, अनिता पांचाळ, समीर नाईक, संतोष तांबे यांच्या उपस्थीतीत पार पडला. यावेळी अंतिम विजयी पावस संघाला रोख रूपये 15000/- आणि चषक तर द्वितीय गावडे आंबेरे संघाला रोख रूपये 10000/- आणि चषक देवून गौरविण्यात आले. तर तृतीय विजेत्या रानतळे संघाला रोख 5000 आणि चषक देवून सन्मानित करण्यात आले.

तर उत्कृष्ट फलंदाज- अरफान नाखवा, उत्कृष्ट गोलंदाज – संकेत पवार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- शुभम मुरकर उत्कृष्ट आयकॉन खेळाडू-अहमद नाखवा, अंतिम सामना सामनावीर-अरफान नाखवा, मालिकावीर- यतिश बिर्जे (सायकल) यांना गौरविण्यात आले. ही पारितोषिके समीर नाईक यांनी पुरस्कृत केली होती.

स्पर्धा यशस्वीतेसाठी महेश दळवी, निसार मुजावर, सचिन शिवणेकर आणि सर्व आशिष मालवणकर मित्रमंडळ यांनी मेहनत घेतली.