ओटवणे (प्रतिनिधी )सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने ओटवणे – शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व १०५ विद्यार्थ्यांना सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने शैक्षणिक साहित्य,खाऊ चे मान्यवरांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडचे एरिया सेल्स मॅनेजर ओंकार पडते, कोलगावच्या रामेश्वर ट्रेडर्सचे मालक सुरेश सुंदेश, सावंतवाडीचे प्रशांत ठाकूर, ओटवणे माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सगुण गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा गावकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, मंगेश भिसे, सदानंद गावकर, पत्रकार दीपक गावकर , ग्रा. सदस्य महेश चव्हाण, विश्वनाथ बोर्ये, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या बरोबर खाऊचे वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री.गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण करणाऱ्या सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड चे आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनीही सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले.सह्याद्री इंडस्ट्री आपल्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवित आपली वाटचाल करत असून त्यांच्या या दातृत्वा बद्दल उपस्थितानमधून कौतुक होत असून त्यांच्या भावी वाटचालीस ग्रामस्थ उपस्थिता मधून शुभेच्छा देण्यात आल्या.










