लांजा (प्रतिनिधी) बारामती येथे होणाऱ्या सहावी १७ वर्षातील टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी तालुक्यातील पुनस हायस्कूलचा विद्यार्थी श्रेयस पांचाळ याची निवड झाली आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती येथे ही सहावी १७ वर्षातील टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांचा संघ सहभागी होणार आहे. या करिता लांजा तालुक्यातील पुनस हायस्कूलचा श्रेयश सचिन पांचाळ याची गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव , टीम मॅनेजर रमाकांत कांबळे, मुचकुंदी परिसर विकास संघ ग्रामीण उपाध्यक्ष गणेश खानविलकर, जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था लांजा तालुका अध्यक्ष योगेश पांचाळ यांनी पुनस हायस्कूल येथे भेट देऊन श्रेयस पांचाळ याला निवडीचे पत्र दिले.
दरम्यान, राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी संघामध्ये निवड झाल्याबद्दल श्रेयस पांचाळ याचे ए एस ऍडव्हान्सरी सर्विसेस चे मालक अमोल पळसमकर आणि सौ. संचिता खानविलकर, पुनस हायस्कूलचे मुख्याध्यापक व्हि. डी. बाईंग, क्रीडा शिक्षक जे. जी. पाटील, शारीरिक शिक्षण अध्यक्ष लांजा तालुका निलेश बागडी, देवधे हायस्कूल मुख्याध्यापक सुशांत राईन, किरण गुरव, दिलीप दिवाळे, सागर भारती, दिनेश झोरे, टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी अध्यक्ष सुमित अनेराव, रोशन किरडवकर, महेश वीर, हर्षतेज पकये यांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या












