खेड रोटरी क्लबतर्फे रक्तगट तपासणी

 

 

खेड(प्रतिनिधी) खेड रोटरी क्लबच्या वतीने शहरातील सहजीवन शिक्षण संस्था संचलित श्रीमान चंदुलाल शेट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ४५० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणीसह हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

इ. १ली ते १०वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष आदित्य गांधी, सेक्रेटरी डॉ. रियाज मुल्ला, डॉ. अनिल जोशी, प्रशाला समिती चेअरमन राजेश बुटाला, संदीप नायकवडी, पराग चिखले,अमित लढ्ढा, संकेत बुटाला, समीर पाटणे, सुयोग बेडेकर, मुख्याध्यापक रोहित
भोळे, प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे, पर्यवेक्षिका लोखंडे आदी उपस्थित होते.