खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेश मारुती पवार यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली.
ते समृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून ग्रामपंचायत समिती सदस्य, चिंचघर सोसायटीचे संचालक व एलपी इंग्लिश स्कूलच्या पालक उपाध्यक्षपदी दोनवेळा जबाबदारी पार पाडली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे












