मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील चिंदर गावची कन्या रेमिता रुजाय फर्नांडिस हिने 2024 साली झालेल्या चार्टर्ड अकाउंट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सीए होण्याचा बहुमान मिळवीला आहे.
मुंबई महानगरपालिका मधून निवृत्त झालेले गुणवंत कामगार व सध्या मुंबई अंधेरी इथे वास्तव्य असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री रुजाय किस्तु फर्नांडिस यांची ती कन्या होय. रेमिता फर्नांडिस हिचे कौतुक होत आहे.












