रत्नागिरी :- महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील
अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारी/समस्या बाबत स्थानिक
स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरिता "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमाव्दारे २९ ऑगस्ट २०२४
रोजी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. ही सुनावणी पुढे ढकलण्यात येत असल्याचे महिला व बाल
विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.











