पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन
शंकर वैद्य साखरपा
कामगार विभागाच्या एका योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या घरामध्ये १९ हजार रुपयांचे गृहोपयोगी वस्तू आणि सुरक्षा संच शासनाकडून मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे ही योजना प्रत्येक घरांमध्ये पोहोचली तर, आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम कबनुरकर हॉल, कोंडगाव, साखरपा येथे संपन्न झाला.
सर्वसामान्य व गरीबकुटूंबाची आर्थिक उन्नती व्हावी, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाने नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात सुरु केला आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कामगारांनी घ्यावा असे आवाहन पालक मंत्री सामंत यांनी केले.
तसेच लेक लाडकी योजना शुभ मंगल योजना, तिर्थदर्शन योजना, लाडकी बहिण योजना ईत्यादी योजनांची माहिती दिली.
या योजना महायुती सरकारने आणलेल्या आहेत आम्ही येतो ते फक्त मत मागण्यासाठी येत नाही तर नवीन नवीन योजना घेऊन तुमच्या दारात येतो या योजनांचा आपण लाभ घ्यावा असे यावेळी पालकमंत्र्यांनी बोलून दाखवले.
यावेळी सुमारे 425 लाभार्थ्यांना संचाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी सरकारी अधिकारी कोंडगाव सरपंच सौ. प्रियांका जोयशी , शिवसेना नेते संजय सुर्वे, ओंकार कोलते ,बापू लोटणकर ,संदीप जोयशी, राजा सावंत, अंकुश सुर्वे,आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी ओंकार कोलते ,हेमंत शिंदे, राजेश कामेरकर ,पत्तु शेडगे यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत घेतली.











