लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील रिंगणे महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विकास चंद्रकांत आयरे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी हॅट्ट्रिक साधली आहे.
गावातील वाद गावातच मिटावेत या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त समिती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत कार्यरत असते. या समितीच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांचे असलेले वाद गावात मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी या समितीचा अध्यक्ष नव्याने ग्रामसभेमध्ये निवडला जातो. रिंगणे ग्रामपंचायतीची तंटामुक्त समिती पदी सलग गेली दोन वर्षे विकास आयरे कार्यरत होते. त्यानी आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात गावातील अनेक वाद मिटविण्यात मोठी भुमिका बजावली होती. त्यांच्या या कामावर विश्वास ठेवुन रिंगणे गावातील ग्रामस्थानी एक मताने दि. ३० आगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सलग तिसर्यादा विकास आयरे यांची तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून बिनविरोध फेरनिवड केली आहे.
या निवडीबद्दल विकास आयरे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.












