नगरसेवक मंगेश लांजेकर यांची वचनपूर्ती

स्वामी स्वरूपानंद नगर येथील कमानी दिली बांधून

लांजा (प्रतिनिधी) शहरातील वैभव वसाहत येथील स्वामी स्वरूपानंद नगर या नव्याने विकसित झालेल्या वसाहतीतीच्या कमानीचे उद्घाटन आज नगरसेवक मंगेश लांजेकर यांच्या हस्ते करण्यात आले .
लांजा नगरपंचायतीच्या अखत्यारीत
येणाऱ्या वैभव वसाहत या प्रभाग क्रमांक दहा मधील नव्याने विकसित झालेल्या स्वामी स्वरूपानंद नगर येथील नागरिकांनी आम्हाला स्वामी स्वरूपानंद नगर अशी कमानी बांधून मिळावी अशी मागणी या प्रभागाचे नगरसेवक मंगेश लांजेकर यांच्याकडे केली होती. यावेळी भाजपाचे नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मंगेश लांजेकर यांनी आपण कमानी बांधून देतो, असे आश्वासन रहिवाशांना दिले होते.

 

त्यानुसार नगरसेवक मंगेश लांजेकर यांनी ही कमानी बांधून देत आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली आहे. या कमानीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला.भाजपाचे नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश लांजेकर यांनी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली असून याबद्दल येथील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले.