कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. संजय दराडे यांची पोलीस मदत केंद्रांना भेट 

 

 

लांजा (प्रतिनिधी) कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. संजय दराडे यांनी आज गुरुवारी मुंबई गोवा महामार्गावर उभारण्यात आलेल्या वेरळ, मठ आणि कुवे येथील पोलीस मदत केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली .

शनिवारी ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि गणेशभक्त हे कोकणात दाखल होत आहेत. अशावेळी कोकणात दाखल होणाऱ्या गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये आणि अपघात किंवा अन्य समस्या उद्भवल्यास त्यांना मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लांजा तालुक्यातील कुवे, वेरळ आणि मठ या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहेत.

या मदत केंद्रांना आज कोकण परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. संजय दराडे यांनी भेट देऊन पाहणी केली .तसेच आवश्यक त्या संबंधितांना सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व अन्य पोलीस अधिकारी ,कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.