वेरळ येथील श्री साई सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वेरळ येथे राबविण्यात आला उपक्रम
संतोष कोत्रे l लांजा-: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा ने वेरळ येथील श्री साई सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वेरळ येथे
कोकणात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत चहा, बिस्कीट, दूध, पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. शेकडो गणेश भक्तांनी याचा लाभ घेतला.
शनिवारी दि.७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई ,पुण्यासह चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत आहेत. या गणेश भक्तांसाठी मोफत चहा, पाणी, दूध, बिस्किट चा उपक्रम मुस्लिम वेल्फेअर सोसायटीने वेरळ येथील श्री साई सेवा मंडळाच्या संयुक्त सहकार्याने हाती घेतला आहे .वेरळ येथील मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या श्री साई मंदिरात या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी झाला.
यावेळी साई मंदिराचे रवींद्र साळवी,मुस्लिम वेलफेयरचे अध्यक्ष रफिक नाईक, कार्याध्यक्ष अकील नाईक, सचिव राजु नाईक, सल्लागार मेराज टोले, मोईझ नाईक, अबीद काझी व साई मंदिराचे सेवक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्लिम वेलफेयर चे संस्थापक अकिल नाईक यांनी केले. दरम्यान, अशाप्रकारे चहा, पाणी व बिस्कीट यांची मोफत सोय केल्यामुळे गणेश भक्तांनी व चाकरमानी मंडळी यांनी आयोजकांचे आभार मानले.











