खेड (प्रतिनिधी) : सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन (SOF) आयोजित इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, सी.बी.एस.ई., मोरवंडे–बोरज येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
या परीक्षेत इयत्ता पहिलीतील कु. ब्लेसी कोळी हिने उत्कृष्ट कामगिरी करत शालेय स्तरावरील सुवर्णपदक पटकावले असून तिच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे. लहान वयात मिळवलेल्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या परीक्षेत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत घवघवीत यश संपादन केले.
इयत्ता पहिलीमधून ब्लेसी कोळी, स्मृती मुढे, स्पृहा मोहिते;
इयत्ता दुसरीमधून आराध्या भाटकर, आलिशा ठसाळे, साई कदम;
इयत्ता तिसरीमधून रिशा चिनकटे, रुही गांधी, नभा निकम;
इयत्ता चौथीमधून धनश्री लवंद, आराध्य खेराडे, अद्वैत तळेकर;
इयत्ता पाचवीमधून काव्या यादव, पृथ्वी पाटील, शर्विल पाटील, तनिष तटकरे;
इयत्ता सहावीमधून मनस्वी आंब्रे, श्रद्धा कासूकर, क्षितिज काते;
इयत्ता सातवीमधून समर्थ शिरगावकर, भार्गव कदम, निनाद मासाळ, आयान भाक्षे;
इयत्ता आठवीमधून अर्चित पाटील तर
इयत्ता नववीमधून रुद्र मोरे, एकांश दळवी, वेदश्री थरवळ
या सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
तसेच नभा शैलेश निकम, अद्वैत श्रीकांत तळेकर, पृथ्वी सिद्धगोंडा पाटील, श्रीतेज रुपेश काते, समर्थ विशाल शिरगावकर, भार्गव चेतन कदम व एकांश मंगेश दळवी या विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाडच्या द्वितीय स्तरासाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मा. श्री. भरत मोरे, इंग्रजी विषयाचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीसह शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.












