मसुरे (प्रतिनिधी ): मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी येथील श्री.भगवान (बाळा ) जगन्नाथ परब (64 वर्ष ) यांचे आकस्मिक निधन झाले. ते राजावाडी हाॅस्पिटल मध्ये सेक्युरिटी गार्ड जमादार या पदावर कार्यरत होते. आपल्या सेवेत कार्यरत असते वेळी त्यांनी अनेक गरजवंतांना हॉस्पिटल मध्ये केस पेपर काढण्यापासून ते ऑपरेशन थिएटरला जाईपर्यंत सर्व मदत केली होती. त्यांनी राजावाडी, कुपर, नायर या हाॅस्पिटल मध्ये जवळपास ३५ वर्षे सेवा केली.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, एक मुलगी, जावई, नातवंडे, दोन भाऊ, बहीणी असा मोठा परिवार आहे. येथील बांदिवडे ग्रामस्थ संघांचे अध्यक्ष आनंद परब यांचे चुलत भाऊ होत.











