खेड(प्रतिनिधी) खेड लायन्स क्लब ऑफ सिटी व श्री समर्थ कृपा बिल्डिंग मटेरियल व हार्डवेअरच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनी हाजी एस. एम. मुकादम हायस्कूल येथे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी पौर्णिमा पवार-नवभारत हायस्कूल भरणे, निवडे मुसा हजवानी स्कूल, सना रावल-गर्ल्स हायस्कूल, आत्तार अब्दुल गणी-मुकादम हायस्कूल, बाळासाहेब भगत- एलपी स्कूल, राजश्री लोखंडे-सहजीवन हायस्कूल, रागिणी जामकर -ज्ञानदीप विद्यामंदिर, विक्रांत जाखरवार – समर्थ स्कूल, वैभव नांदिस्कर – रोटरी स्कूल, चैतन्य भाट -एलटीटी स्कूल, प्रियांका यादव – आंबवली स्कूल, अरुण शिंदे- मुरडे रेवाळे हायस्कूल, विजयकुमार भिसे-सुकदर नं. १, ममता भोसले- तिसे शिगवणवाडी, शर्वरी शिर्के ज्ञानदीप स्कूल मोरवंडे, प्रा. डॉ. चंद्रशेखर यादव- आयसीएस महाविद्यालय यांना गौरवण्यात आले
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भांड, लायन उपप्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले, व्यापारी संघटना चे गोपाळ करवा, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे, संतोष शिंदे, खजिनदार प्रवीण पवार उपाध्यक्ष विनोद झोरे, माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉ. विक्रांत पाटील ओमकार गोंदकर, उमेश चव्हाण डॉ. मरकड, निनाद गांधी, जाधव, विवेक कदम, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल मोरे यांनी केले.










