रानडूकरांकडून आंबव पोंक्षे गावात भातशेती जमीनदोस्त

 

 

*माखजन|वार्ताहर :        संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात रानडुक्करांकडून मोठ्या प्रमाणात भातशेती चे नुकसान झाले आहे.भातशेती सर्वत्र जमीन दोस्त झाली आहे.हीच स्थिती परिसरातील माखजन,करजुवे,धामापूर,सरंद,बुरंबाड, कोंडीवरे,आरवली गावात आहे.रात्रभर शेतीत डुक्कर गोल गोल फिरून शेती मळून काढत आहेत.डुकरांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.अजून भातशेती कापणीला यायला १५ -२० दिवस इतका कालावधी असल्याने या दिवसात मोठं नुकसान होऊ शकत,त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे.या नुकसानी ची पाहणी वनविभागाकडून व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पारंपरिक पारध बंद झाल्याने,गावागावात डुक्करांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.डुक्करांकडून भातशेती,आरारोठ शेतीची नासाडी होत आहे.डोंगरालगत ची शेतीचेच नुकसान होते आहे असे नाही तर वस्ती लगतच्या शेतीत ही डुक्करांकडून नुकसान होत आहे.

यावर वनविभागाकडून तात्काळ उपाययोजना व्हावी व शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.