देवगड येथे अभियंता दिन साजरा

देवगड तालुका अभियंता ठेकेदार संघटनेच्यावतीने १५सप्टेंबर ‘अभियंता दिन’मोठ्या उत्साहात इंद्रप्रस्थ हाँल देवगड येथे साजरा करण्यात आला.शासकीय रुग्णालयात व काही खाजगी रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले.मुख्य कार्यक्रम इंद्रप्रस्थ हाँल देवगड येथे संपन्न झाला.सदर कार्यक्रमात मा.श्री.उदयकुमार महाजनी साहेब, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सिंधुदुर्ग , प्रमुख उपस्थित होते.सोबत अध्यक्ष इंजि.महेंद्र माणगांवकर, सरचिटणीस इंजि.दिलीप कदम तर महिला प्रतिनिधी म्हणून इंजि.रसिका सारंग विचार मंचावर होते.

या स्पर्धेच्या युगात अभियंत्यांचे संघटन महत्वाचे असुन व्यवसायात स्पर्धा जरुर असावी,पण कामात एकमेकांच्या सहकार्याने दर्जा राखून नाव कमवावे.अभियंता हा निसर्गातील वेगळी शक्ती आहे.जग घडवण्याचं महत्वाचे काम अभियंता करतो,असे मा.महाजनी साहेब म्हणाले.बिपीन कोरगांवकर यांनी प्रास्ताविकात, संघटनेच्या कामकाजाचा गेल्या २०/२२वर्षाचा लेखाजोखा मांडला., आणि संघटनेचे महत्त्व पटवून दिले तर रसिका सारंग यांनी महिला म्हणून ठेकेदार व्यवसायात काम करताना सर्वजण चांगले सहकार्य करतात म्हणून काम करणं शक्य होतं!असं म्हणाल्या.संघटनेच्या सर्व प्रकारच्या अडचणीत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची व शेवटच्या सभासदाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहाण्याचा विश्वास अध्यक्ष महेंद्र माणगांवकर यांनी व्यक्त केला.

दिप प्रज्वलन करून व सर मोक्षगुंडंम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.सर विश्वेश्वरय्या यांचा जिवनपट इंजि.दिलीप कदम यांनी मांडला, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तुनिर्मितीसाठी योगदान देणारे हिरोजी इंदुलकर यांच्या कामाची आठवण करून दिली.यावेळी अभियंता दैनंदिनीचे प्रकाशन झाले तसेच २०२४चा आदर्श अभियंता पुरस्कार लघुपाटबंधारे विभागाचे उप अभियंता मा.इंजि.वसंत मोहिते यांना देण्यात आला.यावेळी समिर पेडणेकर, हेमंत देसाई, उपाध्यक्ष रणजित जाधव, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सदाशिव सरोळकर, श्रीकांत घोटगे,रवी चव्हाण, मंगेश रजपूत,लक्ष्मण सूळ,प्रसन्न कदम,वैभव राणे,आशिष जाधव आदी इंजिनिअर ठेकेदार उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनिअर दिलीप कदम यांनी केले तर आभार रणजित जाधव यांनी मानले.

अभियंता दिनानिमित्त दिविजा वृध्दाश्रम असलदे येथे अन्नदान करण्यात आले.