कोल्हापूर बसस्थानकालगत चालत जात असताना ट्रकची धडक
सावंतवाडी । प्रतिनिधी : निगुडे येथील सिताराम सदाशिव उर्फ बाबल चव्हाण (वय ५५ ) यांचे कोल्हापूर शिरगाव येथे ट्रक अपघातात निधन झाले. सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास
ते कोल्हापूर येथून गांवी यायला निघाले होते बसस्थानकाच्या दिशेने रस्त्याच्या कडेने चालत जात असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना स्थानिकांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
सायंकाळी त्यांचा मृतदेह कोल्हापुरहून निगुडे गांवी आणण्यात आला. गावचे सरपंच लक्ष्मण निगुडकर, निवृत्त वायरमन चंद्रकांत निगुडकर उपसरपंच यांच्या उपस्थितीत मंगळवारी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.अत्यंत खडतर
गरीबीत बालपण गेलेले सिताराम यांनी कोल्हापूर शिरगांव येथे एका कारखान्यात नोकरी स्वीकारली होती.मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी सर्वाना आपलेसे केले होते. त्यांच्या अपघाती निधनाबद्दल सरपंच निगुडकर यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, बहिणी, भावोजी असा परिवार आहे.











