गुहागर | प्रतिनिधी : भाजपाचे कोकणचे पालक, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला.
भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका आयोजित रक्तदान शिबीर हे शृंगारतळी शहरालगतच्या पालपेणे रोडवरील भवानी सभागृह घेण्यात आले. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन गुहागर विधानसभा मतदारसंघ संघ निवडणूक प्रमुख, माजी आमदार डॉ विनय नातू यांच्याहस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. रक्त संकलित करण्यासाठी शासकीय रुग्णालय रत्नागिरी मधील टीम आली होती या रक्तदान शिबीरात विविध स्तरांवर काम करणाऱ्या ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भालेकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, अभय भाटकर, लक्ष्मण शिगवण, महिला आघाडी गुहागर तालुकाध्यक्ष अपूर्वा बारगोडे, माजी सभापती दिप्ती असगोलकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, दिनेश बागकर, रविंद्र अवेरे, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, संदिप साळवी, मंगेश जोशी, नरेश पवार, पंचायत समिती माजी सदस्य विजय भुवड, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, अल्पसंख्याक आघाडी संयोजक आसीफ दळवी, विनायक सुर्वे, समीर घाणेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संगम मोरे, आशिष विचारे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या रक्तदान शिबीराला अनेक वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन करणारे, सामाजिक युवा कार्यकर्ते उमेश खैर, साप्ताहिक गुहागर टाईम्सचे संपादक, पेवे माजी सरपंच निसारभाई खान, पत्रकार गणेश किर्वे, वडद उपसरपंच संदिप धनावडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबीरामध्ये सहभागी झालेले रक्तदाते तसेच शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतकांना तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी धन्यवाद दिले.











