महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने जानवळे जिल्हा परिषद शाळा नं.१ मधील आदर्श शिक्षक पुरस्कर प्राप्त राहुल आमटे यांचा सत्कार

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील जानवळे जिल्हा परिषद शाळा नं.१ मधील उपशिक्षक राहुल साधू आमटे यांना नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने जानवळे जिल्हा परिषद शाळा नं.१ मध्ये सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

आदर्श शिक्षक पुरस्कार साठी जिल्हा परिषदच्या शिक्षकांकडून प्रस्ताव शिक्षण विभागाकडे मागविण्यात येतात, त्यानंतर सर्व शिक्षकांच्या जिल्हास्तरीय निवड समितीकडून मुलाखती घेण्यात आल्या तसेच या शिक्षकांचे गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक संशोधन लेखन व व्याख्यान व संवेदनातून शैक्षणिक कार्य साक्षरता अभियान, शिक्षणाचे
वर्गीकरण, शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक मार्गदर्शन ,स्पर्धा परीक्षा शालेय कामाबाबत वरिष्ठांचे अभिप्राय,शैक्षणिक उठाव असे निकष तपासल्यानंतर त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले त्यांच्या नावाला मंजुरी आल्यानंतर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुरस्कार जाहीर केले होते .
या सत्कार प्रसंगी मनसे गुहागर तालुका शेतकरी सेना अध्यक्ष प्रसाद कुष्टे,जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर, पत्रकार गणेश किर्वे , स्वरूपा घोरपडे, दर्शना समगीसकर शालिनी पवार सचिन कांबळे, राहुल आमटे, सोनाली भादेकर आदी मान्यवर उपस्थित होते.