तिहेरी यश संपादन – तीनही जिल्हा स्तरावर निवड
चौके -प्रतिनिधी :-मालवण तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा रेकोबा हायस्कूल मालवण या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेत मालवण तालुक्यातील विविध शाळांचे संघ दाखल झाले होते.
या स्पर्धेत भ.ता.चव्हाण,म. मा. विद्यालय चौके च्या विद्यार्थ्यांनी चार पैकी तीन गटांमध्ये विजय संपादन करून जिल्हास्तरावर प्रवेश मिळवला. तर एका गटामध्ये उपविजेतेपद संपादन केले.
चौके हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 14 वर्षे खालील मुले प्रथम क्रमांक, 14 वर्षे खालील मुली प्रथम क्रमांक,17 वर्षे खालील मुले प्रथम क्रमांक आणि सतरा वर्षे मुली उपविजेते पद संपादन केले.
प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या तीनही गटांची जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या स्पर्धेसाठी चौके हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री.अनिल आचरेकर सर यांनी विशेष मेहनत घेतली होती.
यशस्वी विद्यार्थ्यांचे चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई च्या सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष श्री बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका सौ रसिका गोसावी मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.










