शिरोडा-गांधीनगर पोलीस पाटील पदी मिताली शेट्ये यांची निवड

 

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी :शिरोडा गांधीनगर भागांस शासनाकडून प्रथमच महिला पोलीस पाटील सौ. मिताली मकरंद शेट्ये या याच भागातील नियुक्त केल्याने शिरोडा-गांधीनगर परीसरातील नागरीकांत समाधान व्यक्त होत आहे. या नुतन पोलीस पाटील मिताली शेट्ये यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा वेंगुर्ले तालुका रास्त धान्यदुकान संघटनेचे अध्यक्ष तात्या हाड्ये यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. त्याच प्रमाणे या भागातील नागरीकांनी शुभेच्छा दिल्या. शासनाकडून पोलीस पाटील शिरोडा-गांधीनगर भागास दिल्याने या भागातील व परीसरातील शालेय विद्यार्थी तसेच नागरीकांचे विविध स्वरूपाचे दाखले आता याच भागात तात्काळा मिळतील. त्यासाठी दुसऱ्या पोलीस पाटलांकडे धावण्याची गरज भासणार नाही. अशा भावना या भागातील नागरीकांनी व्यक्त केल्या.