उभादांडा-कुर्लेवाडी येथील शेकडो मच्छिमारांचा भाजपामध्ये प्रवेश..

 

 

बुथकमिटी अध्यक्षपदी किशोर रेवणकर व उपाध्यक्षपदी दादा मोटे यांची निवड

वेंगुर्ले l दाजी नाईक :उभादांडा-कुर्लेवाडी येथील शेकडो मच्छिमारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर याच दरम्यान, भाजपा बुथ कमिटी अध्यक्षपदी किशोर रेवणकर आणि उपाध्यक्षपदी दादा मोटे यांची निवड करण्यात आली.

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमुळे मत्स्यपालक, मच्छिमार आणि जनकृषी क्षेत्राला पुरेशी मदत दिल्याने त्यांच्या उत्पन्ना आणि रोजगारात वाढ झाली आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील शाश्वतता, उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सुरू केल्या विविध योजनांचा मच्छिमारांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले.

भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये गजानन कुबल, गुरूनाथ बांदेकर, तुकाराम तांडेल, दिवाकर कुर्ले, सुरेश कुबल, नामदेव तांडेल, पांडुरंग मोंडकर, भानुदास आरोंदेकर, विठ्ठल भुते, सुधाकर कुर्ले, पंढरीनाथ कोचरेकर, किर्ती कुर्ले, दिपाली कुर्ले, सायली मसुरकर, निलम कुर्ले, दिव्या कुर्ले, गौरी रेवंणकर, प्राची सारंग, उल्का कुबल, अनुश्री तांडेल यांच्यासह १०० जणांचा समावेश आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सदस्य मनवेल फर्नांडीस, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, उभादांडा ग्रामपंचायत सदस्य अस्मिता मेस्त्री, मच्छिमार नेते वसंत तांडेल, पदाधिकारी रमेश नार्वेकर, बाबुराव मेस्त्री आदी उपस्थित होते.

 

भाजपाकडे हिंदुत्वाच्या विचारांचा भक्कम आधार आहे त्यामुळेच अयोध्येत भव्य श्रीराममंदीर होऊ शकले. अशा हिंदुत्ववादी पक्षाच्या पाठीमागे हिदू धर्मियांनी उभे राहीले पाहिजे, असे आवाहन ह.भ.प.सावळाराम कुर्ले यांनी केले.