योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना सुनावले
दापोली | प्रतिनिधी : कंपन्या बाहेर गेले असा आरोप करणाऱ्यांसाठी त्यांनी काय केले असा थेट सवाल करत तत्कारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई कोकणात कोकाकोला कपंनी येणार होती गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे सुभाष देसाई यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मातोश्रीवर भेटण्यासाठी सांगितले होते व अडीच वर्षे जागा दिली नव्हती असं सांगत युवा सेनेचे नेते आमदार योगेश कदम यांनी थेट उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. युवा सेनेच्या निर्धार मेळाव्यात ते दापोली येथे बोलत होते त्यावेळी व्यासपीठावरती भगवान घाडगे उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर,तालुका प्रमुख उमेश राजे, महिला आघाडीच्या श्रेया कदम, रोहिणी दळवी, चारुता कामतेकर ,शिवानी खानविलकर, अमित पारदुले, सुमित जाधव, राजू झगडे आधी पदाधिकारी उपस्थित होते
उद्धव ठाकरे त्यांनी जागा जाणीवपूर्वक दिली नव्हती
पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत रामदासभाई कदम यांनी तात्काळ निर्णय घेतला व कोकाकोला कपंनी लोटे एमआयडीसीमध्ये आली जागा देण्याचा निर्णय लगेच झाला त्यामुळेच तिथे आज रोजगार निर्माण होणार आहे असे योगेश कदम यांनी सांगितले.
आज दापोली येथे युवासेना मिळाला असलेली युवकांचे उपस्थिती हा आदित्य ठाकरे यांना दिलेला इशारा असून आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत हाच इशारा युवकांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी येऊन फक्त भाषणे करायची व निघून जायचे यापलिकडे आदित्य ठाकरे यांनी काही केले नाही काही लोकाना आजवर आपलीच जहागीरदारि आहे अस वाटत होते असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्घाटन कार्यक्रमात मला अपमानित करून संपवण्यासाठी प्रयत्न झाला युवा सेना संपवायला निघाले होते असा घणाघाती आरोप आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांनी केला आहे
युवासेनेच्या माध्यमातून राजकारण करायचे नाही तर मला काही द्यायचे आहे दापोली मतदारसंघात मला अजूनही मोठी काम करायची आहेत.
कोकणात पन्नास टक्के पेक्षा घरे रिकामी युवक शिकला की तो मुंबई पुणे येथे जातो कोकणात थांबत नाही पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत येथील युवकांना रोजगार हा येथेच उपलब्ध व्हावा यासाठी माझे प्रयत्न आहेत. कोकणात मंडणगड तालुक्यात एक हजार एकर एमआयडीसी करण्याचा निर्णय या शासनाने घेतला आहे अशी मोठी घोषणा यांनी या निर्धार मेळाव्यात केली.









