मंडणगड | प्रतिनिधी : ग्रामिण भागातील नागरीक आरोग्य सेवांपासून वंचीत राहू नयेत या उद्देशाने राज्यशासनाने हाती घेतेलेल्या हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाची सुरुवात 1 मे 2023 रोजी मंडणगड येथे करण्यात आली. सार्वजनीक आरोग्य सेवा देणारा आणखी एक दवाखाना मंडणगड मध्ये सुरु झाल्याने शहरासह तालुकावासीयांना ग्रामिण रुग्णालयासह आपला दवाखाना हा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आमदार योगेश कदम यांच्या हस्ते दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी सभापती भाई पोस्टुरे, आदेश केणे, अनंत लाखण, रामदास रेवाळे, तहसिलदार विजय सुर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, डॉ. उदय नागपुरे, नगरसेवक विनोद जाधव, योगेश जाधव, प्रविण जाधव, मुश्ताक दाभिळकर, संजय रेवाळे, संतोष पार्टे, इरफान बुरोंडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील या दवाखान्याचे संचालन नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.