माखजन |वार्ताहर : चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रात आमदार शेखर निकम यांनी अनेक कामाना मंजुरी आणत सध्या कामांचा विकास कामांच्या भूमीपूजनाचा धडाका लावला आहे.
पाच वर्षांमध्ये अनेक विकास कामांचा भरीव निधी आणण्याचा आमदार शेखर निकम यांनी यशस्वी प्रयत्न केल्यावर,कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात विकासकामांची मंजुरी आणि भूमिपूजन सोहळ्याची जोरदार बॅटिंग सुरू आहे.विधानसभेची निवडणूक वाढवताना जनतेसमोर विकासकामांचा चढता आलेख ठेवताना दिसत आहेत.चिपळूण येथे अजित दादा आलेले असताना,त्यांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम यांनी आपल्या कामांचा लेखाजोगा मांडणारे पुस्तक प्रकाशित केले होते.
१४ रोजी माखजन विभागात एकाच दिवशी तब्बल १७ कोटींच्या मंजूर कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहे.यामध्ये ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २(बॅच १) मधून धामापूर भायजे वाडी रस्त्यासाठी ५ कोटी मंजूर झाले आहेत.याच विभागाकडून धामापूर मावळांगे मांडरकरवाडी आंबेत माखजन रस्त्याला ५ कोटी ११ लाख ,इजिमा ३८ ते नारडुवे सडे वाडी मधली वाडी रस्त्यासाठी ६ कोटी ६८ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या विकास कामांची भूमीपूजन होणार आहेत.अनेक काळ जनतेची मागणी असणारी कामे पूर्णत्वास जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे.











