Santhosh Kulkarni was awarded meritorious technical staff award from Ratnagiri Division on 1st May Labor Day
महावितरण च्या म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित रत्नागिरी परिमंडळ रत्नागिरी कडून दिल्या गेलेल्या प्रशस्तीपत्रकात म्हटले आहे की, श्री. संतोष विनायक कुलकर्णी. प्रधान यंत्रचालक हे ३३/११ के. व्ही. हार्बर उपकेंद्र, विभाग रत्नागिरी शहर, उपविभाग रत्नागिरी शहर येथे कार्यरत आहेत. तेथे कंपनीने नेमून दिलेल्या कामानुसार उपकेंद्राची देखभाल करणे, अचानक उदभवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या समस्येचे तातडीने निराकरण करणे, संभाव्य अपघात कार्यकौशल्याने टाळून उत्कृष्टपणे कर्तव्य बजावली आहेत. त्याकरिता दाखवलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता, निष्ठा व समर्पितवृत्ती या गुणांचा गौरव करून त्यांना १ मे, कामगारदिनी सन २०२३ करिता उत्कृष्ट यंत्रचालक म्हणून सन्मानित करून हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे.
संतोष कुलकर्णी यांनी 31वर्ष प्रदीर्घ महामंडळ व महावितरण कंपनीत सेवा करून निवृत्तीला ऐक वर्ष असताना त्यांना हा बहुमान मिळाला. संतोष कुलकर्णी यांनी तांत्रिक कर्मचारी संघटनेचे पंचवीस वर्षे काम केले या कालावधीत विभागीय सचिव ते विभागीय अध्यक्ष ही पदेही त्यांनी भूषवली












