फसवणूक करणाऱ्याना मालवणी ‘हिसका’

 

मालवणात व्यापाऱ्यांची सतर्कता

मालवण | प्रतिनिधी : बेबनाव करून देणगी (पैसे) गोळा करण्याच्या उद्देशाने मालवण शहर परिसरात फिरून हजारो रुपये जमा करणाऱ्या दोघा तरुणांना मालवण शहरातील सतर्क व्यापाऱ्यांनी पकडले. पोलीसांनाही माहिती देण्यात आली.

त्याच्याकडे चौकशी केली असता
विसंगत माहिती समोर आली. आपण आता अडकले जाणार या भीतीने त्या तरुणांनी शहरात ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते परत केले. आता आम्ही इथे थांबत नाही. कोणाकडून पैसे मागणार नाही. असे सांगत त्यांनी पळ काढला. त्या नंतर तिकडे पोलीस दाखल झाले. घटनेची माहिती घेतली.

पैसे केले परत

आलेले दोन्ही तरुण अन्य जिल्ह्यातून मोटरसायकलने आले होते. ही माहिती समोर आली. त्यांना कशाला आले विचारले असता पोलिसांना माहिती देऊन एका संस्थे साठी देणग्या गोळा करतो. अशी ही उत्तरे त्यांनी दिली. मात्र अधिक चौकशी होत असता बाजारातील ज्यांच्या कडून पैसे घेतले त्यांना पैसे देऊन पळ काढला. जर हे तरुण खरोखर सामाजिक काम करत असते तर पळाले नसते अशीही चर्चा सुरु होती.